UPI Payment: आता डिजिटल पेमेंट आणखी सोपं! PIN न टाकताही होणार व्यवहार; काय आहे हे नवीन फीचर?

UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता 5 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी PIN टाकण्याऐवजी फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीद्वारे पेमेंट करता येणार आहे.

UPI Payment: आता डिजिटल पेमेंट आणखी सोपं! PIN न टाकताही होणार व्यवहार; काय आहे हे नवीन फीचर?

UPI Payment: डिजिटल पेमेंटचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. किराणा दुकानापासून मोठ्या व्यवहारांपर्यंत सर्वत्र युपीआय द्वारे पेमेंट केले जाते. अशातच आता युपीआय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि सोयीची अपडेट समोर आली आहे. आता काही व्यवहारांसाठी युपीआय पिन टाकण्याची गरज कमी होणार असून बायोमेट्रिक पडताळणीद्वारेही पेमेंट करता येणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युपीआय व्यवहार अधिक सोपे आणि जलद करण्यासाठी नवीन बायोमेट्रिक पेमेंट फीचर लागू केले आहे. या सुविधेमुळे वापरकर्ते फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीच्या मदतीने पेमेंट करू शकतील. विशेष म्हणजे ही सुविधा अँड्रॉइडसोबतच आयफोन वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा: Induction Buying Guide: LPG संकटात इंडक्शन घेताय? घाई नको, आधी 'हे' वाचा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

सध्या ही सुविधा ठराविक रकमेपर्यंतच्या व्यवहारांसाठी लागू असेल. साधारणपणे ५ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार करताना वापरकर्त्यांना पिन टाकण्याऐवजी बायोमेट्रिक पडताळणीचा पर्याय मिळू शकतो. मात्र यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करताना पूर्वीप्रमाणेच युपीआय पिन टाकणे आवश्यक असेल. त्यामुळे सुरक्षा कायम राखत व्यवहार अधिक जलद करण्याचा प्रयत्न या सुविधेतून करण्यात आला आहे.

आतापर्यंत काही मर्यादित अ‍ॅप्समध्येच बायोमेट्रिकद्वारे पेमेंटची सुविधा होती. पण आता ही सुविधा अधिक व्यापक स्वरूपात उपलब्ध होत असून विविध युपीआय अ‍ॅप्समध्ये ती वापरता येणार आहे. फोनपे, गुगल पे, भीम यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये हे फीचर वापरण्याची सोय मिळू शकते.

ही सुविधा वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमचे पेमेंट अ‍ॅप अपडेट असणे गरजेचे आहे. त्यानंतर अ‍ॅपमध्ये बायोमेट्रिक पेमेंट किंवा फेस आयडी पेमेंट असा पर्याय शोधून तो सक्रिय करावा लागतो. एकदा हा पर्याय सुरू केल्यानंतर सुरुवातीला पडताळणीसाठी युपीआय पिन विचारला जाऊ शकतो. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील व्यवहार करताना फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीद्वारे पेमेंट करता येईल.

हेही वाचा: Difference Between Lpg Cng & Png: सिलेंडरमधला LPG, पाइपमधला PNG आणि गाडीतला CNG; पण 'या' तिन्ही गॅसमध्ये नेमका फरक काय?

या बदलामुळे वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा लोकांना युपीआय पिन आठवत नाही किंवा चुकीचा पिन टाकल्यामुळे व्यवहार अडखळतो. नवीन बायोमेट्रिक प्रणालीमुळे हा त्रास कमी होईल. शिवाय पेमेंट अधिक वेगाने पूर्ण होईल, त्यामुळे दैनंदिन व्यवहार अधिक सोपे होतील.

डिजिटल पेमेंट्स अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. भविष्यात अशा आणखी सुविधांमुळे UPI व्यवहार अधिक जलद आणि स्मार्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी ही सुविधा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number