Saturday, June 15, 2024 05:10:12 PM

Ajit Pawar
तटकरेंनी लाज राखली

राष्ट्रवादी पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात साजरा झाला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांचे कान टोचले.

तटकरेंनी लाज राखली

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात साजरा झाला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांचे कान टोचले. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंनी पक्षाची लाज राखली, असे अजित पवार म्हणाले. रालोआ सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५३ आमदार निवडून आले. विधानपरिषदेचे आमदार धरले तर एकूण आमदारांची संख्या ६० च्या घरात जाते. यामुळे विधानसभेच्या किमान १०० जागा लढवण्याची तयारी करायलाच हवी, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असे निर्देश दिले. 

लढवून जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार अजित पवारांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला. सध्या पक्षाकडे संसदेत लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी एक खासदार आहे. पण जुलैअखेर किंवा ऑगस्टपर्यंत राज्यसभेत ३ खासदार होतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. ज्या समाजाने लोकसभेवेळी आपल्यापासून अंतर ठेवले त्याला विश्वासात घ्यायला हवे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारी राष्ट्रवादी यापुढेही विकासाकरिता, समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी काम करेल, असेही अजित पवार म्हणाले.

        

सम्बन्धित सामग्री