मुंबई : गोरेगावमध्ये गरबा खेळताना 19 वर्षाच्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोरेगाव पश्चिमेतील गोकुळ गणेश मैदानावर ही घटना घडली असून या घटनेनंतर संपूर्ण मुंबईत खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुजरातमधून मुंबईत गरबा खेळण्यासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. जय हितेश चरला असे मृत तरुणाचे नाव असून तो गुजरातमधील अधोई गावचा रहिवासी होता. गोकुळ गणेश मैदानावर सुरू असलेल्या सेजल रास उत्सवादरम्यान सोमवारी रात्री ही घटना घडली. गरबा खेळताना जय अचानक खाली कोसळल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच धाव घेतली. त्यानंतर त्याला तातडीने सीपीआर देखील देण्यात आला पण तोपर्यंत उशीर झाला गोता. जय चरलाला यापूर्वी हृदयाशी संबंधित समस्या असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आयोजकांनी उत्सवाच्या शेवटच्या रात्रीचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.