रणबीर कपूरही होता हल्लेखोरांच्या टार्गेटवर? वांद्र्‌यातील घराची हल्लेखोरांकडून रेकी; प्रकरणात नवा ट्विस्ट

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. आता आणखी एका सुपरस्टार अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.

रणबीर कपूरही होता हल्लेखोरांच्या टार्गेटवर? वांद्र्‌यातील घराची हल्लेखोरांकडून रेकी; प्रकरणात नवा ट्विस्ट
Ranbir Kapoor

रविवारी 18 ऑक्टोबर रोजी अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर तब्बल सहा ते सात राउंड फायर करण्यात आलेले. या प्रकरणानं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली होती की, सुरुवातीला हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी टायगर श्रॉफ नसून आरोपी मुंबईत एका मोठ्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते. आरोपींनी टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यापूर्वी आमिर खान, अमिताब बच्चन, अक्षय कुमार आणि सलमान खानच्या घराचीही रेकी केल्याची माहिती समोर आली.

मात्र या अभिनेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहून आरोपी माघारी फिरले. त्यानंतर हल्लेखोरांनी टायगर श्रॉफची रेकी करत त्याच्या मुव्हमेंट ट्रेस केल्या होत्या. या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि आरोपींना अटक केली. आता या प्रकरणी आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. आता आणखी एका सुपरस्टार अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.

हेही वाचा- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर; खऱ्या सूत्रधाराचं नावं अखेर समोर? हरियाणाशी काय कनेक्शन?

टायगरवर हल्ला करण्याचं फायनल करण्यापूर्वी आरोपींनी रणबीर कपूरच्या घराचीही रेकी केलेली. टायगरवर हल्ला करणारे हल्लेखोर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या वांद्रे इथल्या घराची रेकी करत होते. टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या हल्लेखोरांबाबत समोर आलेल्या नव्या माहितीमुळे सेलिब्रिटींमधील चिंता अधिकच वाढली आहे.

दरम्यान टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर असून 8 आरोपीं ताब्यात घेतल्यानंतर आणखी 2 आरोपी अटकेत आले आहेत. तसेच टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आता हरियाणातील सोनीपत कनेक्शन उघड झाले आहे. टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात 10 आरोपींपैकी 7 आरोपी हरियाणातील सोनीपतचे असल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number