Saturday, July 20, 2024 12:02:31 PM

Mumbai
आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा

मालाड पश्चिम येथे एका महिलेने ऑनलाईन पद्धतीने बटरस्कॉच आईस्क्रीम मागवले. या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा असल्याचे महिलेला आढळले.

आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा

मुंबई : मालाड पश्चिम येथे एका महिलेने ऑनलाईन पद्धतीने बटरस्कॉच आईस्क्रीम मागवले. मागवलेले आईस्क्रीम थोड्याच वेळात घरपोच मिळाले. या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा असल्याचे महिलेला आढळले. या प्रकरणी महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आईस्क्रीम जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहे. आईस्क्रीम निर्मात्या कंपनी विरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. पुढील पोलीस कारवाई सुरू आहे. 

           

सम्बन्धित सामग्री