Teen Booked in America : आजकाल आपण लहानसहान माहितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) अवलंबून असतो. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर किंवा समस्येवर उपाय हवा असेल, तर AI काही सेकंदांत उत्तर देतो. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर विधायक आणि विघातक अशा दोन्ही प्रकारे होण्याचा धोका असतो, ज्यामुळे अनेकदा लोक अडचणीत येतात. असाच काहीसा प्रकार एका शालेय मुलासोबत घडला आहे, ज्यामुळे शाळा प्रशासन आणि संपूर्ण समाजाला तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.
नेमके काय घडले हे प्रकरण?
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात राहणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा विद्यार्थी सध्या त्याच्या एका चुकीची शिक्षा भोगत आहे. Yahoo News कॅनडाच्या वृत्तानुसार, ही घटना डेलँड शहरातील साऊथ वेस्टर्न मिडिल स्कूलची आहे. या शाळेत सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने वर्गात असताना ChatGPT वर एक प्रश्न टाइप केला, ज्यामुळे त्याला मोठी किंमत मोजावी लागली.
या विद्यार्थ्याने ChatGPT ला प्रश्न विचारला होता, 'मी माझ्या मित्राला कसे मारू शकतो?' (How can I kill my friend?) मग काय.. थेट पोलिसांना संदेश पोहोचला आणि पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले.
हेही वाचा - Meta New Feature: रील करणाऱ्यांसाठी खास भेट, मेटाचे नवीन फिचर तुमची कमाई दुप्पट करेल, जाणून घ्या
डिजिटल सिस्टिम ॲक्टिव्ह, मुलगा ताब्यात
या मुलाने जसा हा प्रश्न विचारला, तशी शाळेतील डिजिटल मॉनिटरिंग सिस्टिम (Digital Monitoring System) लगेच सक्रिय झाली. या सिस्टिमने शाळा प्रशासन आणि पोलिसांना त्वरित अलर्ट पाठवला. काही वेळातच शाळेत पोलीस दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.
मुलाचा हेतू: चौकशीत असे उघड झाले की, या मुलाला कोणालाही नुकसान पोहोचवण्याचा हेतू नव्हता. त्याने सांगितले की, त्याला त्रास देणाऱ्या एका मित्राची गंमत करण्यासाठी आणि 'ChatGPT वर काहीतरी मजेशीर उत्तर येते का?' हे पाहण्यासाठी त्याने हे केले. मजेशीर उत्तर मिळाल्यावर सहकाऱ्याला चिडवता येईल यासाठी हा उद्योग केल्याचे त्याने सांगितले.
प्रशासनाने घेतली गंभीर दखल
मुलगा जरी 'मस्करी' करत असल्याचे सांगत होता, तरी पोलीस आणि शाळा प्रशासनाने या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने घेतले. मुलाचे असे वागणे संभाव्य धोक्याकडे इशारा करते आणि यास हलक्यात घेता येत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात (Juvenile Detention Center) पाठवले असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अनेकदा आपण 'स्मार्ट' दिसण्यासाठी इंटरनेटवर ज्या गोष्टी सर्च करतो, त्या चुकीच्या आणि धोकादायक सिद्ध होऊ शकतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - Gmail V/S Zoho Mail: Gmail सोडा आणि काही मिनिटांत Zoho Mail वर शिफ्ट व्हा; स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या