नालासोपाऱ्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नालासोपारा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलावर एका पाण्याच्या टँकर एक रिक्षा आणि 3 स्कूटरला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे दोन्ही दिशांना मोठी वाहतूक कोंडी झाली.
समोर आलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलावर पाण्याच्या टँकरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे नियंत्रण सुटलेल्या टँकरने पुढे असलेल्या एका रिक्षासह तब्बल तीन स्कूटरला जोरदार धडक दिली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे पुलावर एकच गोंधळ उडाला. धडकेनंतर रिक्षा आणि दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दरम्यान, अपघातामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Mumbai, Maharashtra: A water tanker collided with a rickshaw and scooter on the Nalasopara East-West bridge after an apparent brake failure, according to traffic police. Four to five people were injured. The accident caused heavy traffic congestion in both directions, while… pic.twitter.com/nb7nljFGr8 — IANS (@ians_india) October 3, 2026