नालासोपाऱ्यात भीषण अपघात! पाण्याच्या टँकरची रिक्षासह स्कूटरला जोरदार धडक; चार ते पाच जण…

नालासोपाऱ्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नालासोपारा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलावर एका पाण्याच्या टँकर एक रिक्षा आणि 3 स्कूटरला जोरदार धडक दिली आहे.

नालासोपाऱ्यात भीषण अपघात! पाण्याच्या टँकरची रिक्षासह स्कूटरला जोरदार धडक; चार ते पाच जण…
Nalasopara Accident

नालासोपाऱ्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नालासोपारा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलावर एका पाण्याच्या टँकर एक रिक्षा आणि 3 स्कूटरला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे दोन्ही दिशांना मोठी वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा- धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रयत्न; पाय घसरताच प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये, RPF जवान धावून आला अन्…

समोर आलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलावर पाण्याच्या टँकरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे नियंत्रण सुटलेल्या टँकरने पुढे असलेल्या एका रिक्षासह तब्बल तीन स्कूटरला जोरदार धडक दिली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे पुलावर एकच गोंधळ उडाला. धडकेनंतर रिक्षा आणि दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दरम्यान, अपघातामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number