पहिल्या नोटिशीनंतर पुन्हा दणका, Imran Khan प्रकरणात नवा ट्विस्ट

Imran Khan's OCI Status : अभिनेता इम्रान खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारत सोडा नोटिशीनंतर आता त्यांना आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या ओसीआय दर्जाबाबत केंद्र सरकारकडून पुढील निर्णय घेतला जाणार असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या नोटिशीनंतर पुन्हा दणका, Imran Khan प्रकरणात नवा ट्विस्ट
Imran Khan Actor

अभिनेता इम्रान खान याच्या अडचणीत आजा पुन्हा एकदा वाढ झाली असून त्याला आता दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे. तुमचा OCI दर्जा का रद्द करु नये, अशी कारणे दाखवा, असे या नोटीसीमध्ये म्हटले गेले आहे. 14 ऑक्टोबर रोजी इम्रान खानला भारत सोडी ही नोटीस बजावली होती, त्यानंतर मुंबईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने शनिवारी त्याला ही दुसरी नोटीस पाठवली आहे.

यावेळी त्याचा ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडियाचा दर्जा का रद्द करु नये, याचे कारण दाखवण्यास सांगण्यात आलेले आहे. अमेरिकन नागरिक असलेल्या इम्रान खानला 15 डिसेंबर 2006 रोजी OCI कार्डधारकाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे. केंद्र सरकार आता भारतात त्याने केलेल्या कामांचे स्वरुप आणि परिस्थिती तसेच त्याचे परिणाम विचारात घेत OCI ही नोंदणी रद्द करायची की नाही, याचा निर्णय घेणार आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number