‘जो कोणी आमचं ऐकणार नाही त्याचा नंबर पुढचा…’; टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगच्या नव्या धमकीने खळबळ

या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि मुंबई शहरात मोठी घबराट पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुहूमधील पुष्पा पार्क भागात टायगरची कार बाहेर पडत असताना तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी अचानक गाडीच्या दिशेने गोळीबार केला.

‘जो कोणी आमचं ऐकणार नाही त्याचा नंबर पुढचा…’; टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगच्या नव्या धमकीने खळबळ
Bishnoi gang threat

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर मुंबईतील जुहू परिसरामध्ये अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि मुंबई शहरात मोठी घबराट पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुहूमधील पुष्पा पार्क भागात टायगरची कार बाहेर पडत असताना तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी अचानक गाडीच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. सुदैवाने या भीषण हल्ल्यातून अभिनेता टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावरून घेतली हल्ल्याची जबाबदारी

या घटनेनंतर लागलीच सोशल मीडियावर एक पत्रक प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. या पत्राद्वारे त्यांनी स्पष्ट धमकी दिली आहे की, अभिनेत्याला आधीच समज देण्यात आली होती, मात्र त्याने दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यासोबतच, मुंबई चित्रपटसृष्टीतील ज्या व्यक्ती आमचे ऐकणार नाहीत किंवा अभिनेता सलमान खानसोबत काम करतील, त्यांना अशाच परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशाराही या गँगकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा – अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरुन आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या; बॉलिवूडमध्ये खळबळ

घटनेचा व्हिडिओ समोर; पोलिसांकडून तपास गतिमान

या संपूर्ण थराराचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. टायगरची गाडी घराबाहेर पडताच चाहत्यांची गर्दी जमली होती, त्याच वेळी अचानक गोळीबाराचे आवाज झाले आणि परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली. घटनास्थळी अंदाजे 5 गोळ्या झाडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी प्रत्यक्ष आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. टायगरला 1 वर्षापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number