मुंबई : राज्य सीईटी कक्षातर्फे एमई, एमटेक आणि एमआर्क या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. एमई आणि एमटेक या अभ्यासक्रमांसाठी मे महिन्यात सीईटी परीक्षा झाली होती. तर, एमआर्कसाठी त्या आधीच परीक्षा पार पडली. आता मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज नोंदणीची अंतिम तारीख १७ जुलै असेल.