Thursday, November 13, 2025 08:55:15 AM

Pakistani- Afghanistan Conflict : अफगाणिस्ताने पाकड्यांना धडा शिकवला! तालिबानी हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक ठार, अनेक सीमा चौक्या ताब्यात

अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या कारवाईत त्यांच्या अनेक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, ज्यात कुनार आणि हेलमंड प्रांतातील चौक्यांचाही समावेश आहे.

pakistani- afghanistan conflict  अफगाणिस्ताने पाकड्यांना धडा शिकवला तालिबानी हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक ठार अनेक सीमा चौक्या ताब्यात

Pakistani- Afghanistan Conflict : काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलजवळ (Kabul) झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर (Pakistani Air Strike) पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर (Pakistan-Afghanistan Border) शनिवारी उशिरा तीव्र संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. या संघर्षात तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सैन्याने ड्युरंड लाईनवरील (Durand Line) पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, ज्यात कुनार आणि हेलमंड प्रांतातील चौक्यांचाही समावेश आहे, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

सीमेवर 12 पाकिस्तानी सैनिक ठार
अफगाण संरक्षण अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "तालिबान सैन्याने ड्युरंड लाईनवरील कुनार (Kunar) आणि हेलमंड (Helmand) प्रांतातील पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवर (Pakistani Military Posts) ताबा मिळवला आहे."
तीव्र संघर्षानंतर जखमी आणि मृत: बहरामचा जिल्ह्यातील शाकीज, बीबी जानी आणि सालेहान भागात तसेच पाकतीयातील आर्यूब झाझी जिल्ह्यातही तीव्र संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर सुरू असलेल्या संघर्षात किमान 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत आणि इतर अनेक जण जखमी झाले आहेत. ही कारवाई स्थानिक वेळेनुसार मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.

हेही वाचा - मोठी बातमी ! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला ; आधीच दिला होता इशारा पण...

अफगाणिस्तानकडून कारवाईचे स्पष्टीकरण
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानकडून विनाकारण करण्यात आलेल्या गोळीबाराला त्यांचे सैन्य पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खोवाराझमी यांनी ही कारवाई पाकिस्तानने अफगाण एअरस्पेसचे उल्लंघन (Violation of Afghan Airspace) केल्याच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
पुन्हा हल्ल्याचा इशारा: "जर विरोधी बाजूने पुन्हा अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले, तर आमचे सशस्त्र दल त्यांच्या हवाई हद्दीचे संरक्षण करण्यास सज्ज आहे आणि जोरदार प्रत्युत्तर देईल," असे खोवाराझमी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कतारने (Qatar) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या सीमा तणावावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे (Exercise Restraint) आणि चर्चेद्वारे (Dialogue) आपले मतभेद सोडवावेत असे आवाहन केले आहे.

तालिबानच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांचे नुकसान
पाकिस्तानने काबूलजवळ एअरस्ट्राईक (Airstrike) केल्याच्या काही दिवसांनंतर सीमेवर हा संघर्ष पेटला आहे. अफगाणिस्तानच्या 201 खालिद बिन वालिद आर्मी कॉर्प्सने (201 Khalid Bin Walid Army Corps) म्हटले आहे की, पाकिस्तानच्या या कृतीमुळे नांगरहार (Nangarhar) आणि कुनार येथील पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दाखल कारवाई सुरू करण्यात आली.
पायाभूत सुविधा नष्ट: अफगाण संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "रात्रीच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या बाजूच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि उपकरणे (Equipment) नष्ट झाली."
चौक्या उद्ध्वस्त: कुनार आणि हेलमंड प्रांतातील प्रत्येकी एक चौकी उद्ध्वस्त करण्यात आली असून, पाकिस्तानी लष्कराचे सैनिक ठार झाले आहेत, तसेच तालिबानच्या सैनिकांनी त्यांची अनेक शस्त्रे आणि वाहने देखील उद्ध्वस्त केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, पाकिस्तानने अद्याप हे हल्ले झाल्याचे मान्य किंवा नाकारलेले नाही.

हेही वाचा - Pakistan Attack Kabul: तालिबान-पाकिस्तान संबंधात तणाव! काबूलमध्ये पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात TTP प्रमुख नूर वली मेहसूदचा मृत्यू


सम्बन्धित सामग्री