Flight Emergency Landing: 36,000 फूट उंचीवर असताना इंजिनातून ‘तो’ अलर्ट; एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे कोची येथे इमर्जन्सी लँडिंग

धोक्याचा अंदाज येताच क्रू मेंबर्सने तातडीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला.

Flight Emergency Landing: 36,000 फूट उंचीवर असताना इंजिनातून ‘तो’ अलर्ट; एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे कोची येथे इमर्जन्सी लँडिंग

Air India Express Flight Emergency Landing in Kochi: केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबू धाबीकडे निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बोईंग 737 (Boeing 737) विमानाला उड्डाणानंतर काही वेळातच गंभीर तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. 'फ्लाईट IX 415' (Flight IX 415) ने उड्डाण घेतल्यानंतर साधारण 50 मिनिटांनी, विमान 36,000 फूट उंचीवर असताना वैमानिकांना इंजिन क्रमांक 1 मधील तेलाची पातळी (Oil Quantity) वेगाने कमी होत असल्याचे आढळले. धोक्याचा अंदाज येताच क्रू मेंबर्सने तातडीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला.

वैमानिकांचे प्रसंगावधान अन् 'फॉरडेक' (FORDEC) चाचणी
तेलाचा दबाव अचानक कमी होऊ लागल्याने वैमानिकांनी तातडीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 'FORDEC' ही मानक निर्णय प्रक्रिया (Decision-making process) राबवली. तपासणीदरम्यान इंजिनमधील तेलाचा दाब धोक्याच्या लाल चिन्हापर्यंत (Danger Zone) पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सुरक्षा नियमांनुसार इंजिन क्रमांक 1 पूर्णपणे बंद करण्यात आले. एकाच इंजिनच्या सहाय्याने विमानाचा मार्ग हवेतच बदलून ते पुन्हा भारताच्या दिशेने वळवण्यात आले आणि कोची विमानतळाच्या दिशेने सुरक्षित प्रवासाला सुरुवात झाली.

हेही वाचा – IndiGo Flight : नशीब बलवत्तर म्हणून…! नवी मुंबईहून गेलेल्या IndiGo विमानाचा अपघात; लँडिंगदरम्यान प्रवाशांमध्ये एकच खळबळ

सर्व प्रवासी सुरक्षित; तांत्रिक तपासणी सुरू
वैमानिकांच्या समयसूचकतेमुळे आणि कौशल्यामुळे विमानाचे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी आणि सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, ज्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला. विमानावरील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. या घटनेनंतर विमानाची उड्डाण सेवा तूर्तास स्थगित करण्यात आली असून, इंजिनमधील तेल गळतीचे किंवा दाब कमी होण्याचे नेमके तांत्रिक कारण काय होते, याचा सखोल तपास नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि तांत्रिक पथकाकडून केला जात आहे.

हेही वाचा – Driving Licence New Rules : आता केवळ दंड भरून सुटका नाही; 'या' एका चुकीमुळे ड्रायव्हिंग लायसन्स थेट होणार रद्द! नितीन गडकरींनी सांगितलं..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number