Amitabh Bachchan: ‘एकामागोमाग एक सगळे सोडून जात आहेत…’; जिवलग मित्राच्या निधनाने अमिताभ बच्चन भावुक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी जिवलग मित्राच्या निधनाची भावनिक माहिती ब्लॉगद्वारे चाहत्यांशी शेअर केली.

Amitabh Bachchan: ‘एकामागोमाग एक सगळे सोडून जात आहेत…’; जिवलग मित्राच्या निधनाने अमिताभ बच्चन भावुक

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी आणखी एका जिवलग मित्राला गमावल्याची भावनिक माहिती  ब्लॉगद्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे. या दुःखद घटनेमुळे ते भावूक झाल्याचे दिसून आले. बच्चन यांच्या मित्राच्या निधनानंतर त्यांनी लिहिलेल्या शब्दांतून त्यांच्या मनातील वेदना आणि आठवणी स्पष्टपणे उमटल्या.

ब्लॉगमध्ये श्रद्धांजली अर्पण करताना अमिताभ बच्चन यांनी दिवंगत मित्राच्या स्वभावाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी लिहिले की, त्यांचा मित्र नेहमी कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद ठेवणारा आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाचा होता. “मी माझा आणखी एक अतिशय जवळचा मित्र गमावला आहे. तो नेहमी हसतमुख असायचा. त्याच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा कायम लक्षात राहील. तो आता आपल्यात नाही, हे अजूनही विश्वास बसत नाही. एकामागोमाग एक सगळे निघून जात आहेत,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत संवेदना व्यक्त केल्या. अनेकांनी त्यांच्या मित्राच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली, तर काहींनी अमिताभ बच्चन यांना या कठीण काळात धैर्य आणि ताकद मिळावी अशी भावना व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी सहानुभूती व्यक्त करत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Mojtaba Khamenei Middle East Conflict: युद्धादरम्यान इराणची परिस्थिती अधिकचं चिंताजनक; इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोमात?

अमिताभ बच्चन हे ब्लॉगवरून अनेकदा आयुष्यातील आठवणी आणि जवळच्या व्यक्तींबद्दलच्या भावना व्यक्त करत असतात. विशेषतः ज्यांनी त्यांच्यासोबत आयुष्याचा प्रवास केला, अशा मित्रांबद्दल ते वेळोवेळी मनोगत लिहितात. त्यांच्या लेखनातून नात्यांची जपणूक आणि आयुष्याबद्दलची संवेदनशीलता स्पष्ट दिसून येते.

दरम्यान, काही काळापूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतरही अमिताभ बच्चन भावूक झाले होते. त्यांनी त्यावेळी लिहिलेल्या नोटमध्ये धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मनापासून कौतुक केले होते. धर्मेंद्र हे मोठ्या मनाचे, साध्या स्वभावाचे आणि जमिनीशी जोडलेले कलाकार होते, असे त्यांनी नमूद केले होते.

अमिताभ बच्चन यांच्या मते, धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वात त्यांच्या पंजाबमधील गावाची साधेपणा कायम जाणवत असे. त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे आसपासचे वातावरणही प्रसन्न होत असे. अशा आठवणींनी भरलेले मित्र आता एकामागोमाग एक दूर जात असल्याची जाणीव होत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले आहे.

हेही वाचा: Share Market Today: काय करावं आता? शेअर बाजारातील घसरण थांबता थांबेना; सेन्सेक्स सुरुवातीलाच 590 अंकांनी कोसळला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number