Tuesday, June 09, 2026 02:32:43 PM

Chakda Xpress Movie : अनुष्का शर्माची 'चकदा एक्सप्रेस' पडद्यावर कधी येणार? चित्रपट पूर्ण होऊनही झाला नाही रिलीज ; अभिनेत्याने केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'चकदा एक्सप्रेस' पूर्ण होऊनही अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

chakda xpress movie  अनुष्का शर्माची चकदा एक्सप्रेस पडद्यावर कधी येणार चित्रपट पूर्ण होऊनही झाला नाही रिलीज  अभिनेत्याने केला मोठा खुलासा

मुंबई: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तिचे चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनुष्काचा आगामी चित्रपट 'चकदा एक्सप्रेस' हा भारतीय महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांचा बायोपिक असून, त्याचे शूटिंग 2022 मध्येच पूर्ण झाले होते. मात्र, 2023 मध्ये पोस्ट-प्रॉडक्शन सुरू होऊनही हा चित्रपट अजूनही प्रदर्शित झालेला नाही. या प्रलंबीत प्रदर्शनाबाबत आता सह-कलाकार दिब्येंदु भट्टाचार्य यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लंडनमध्ये स्थायिक आणि चित्रपटातून दुरावा

विराट कोहली सध्या आयपीएलसाठी भारतात असला, तरी हे जोडपे त्यांच्या मुलांसह लंडनमध्ये स्थायिक झाले आहे. अनुष्का शर्मा केवळ काही ब्रँड प्रमोशनसाठीच भारतात येते आणि तिचा जास्तीत जास्त वेळ लंडनमध्येच जातो. अनुष्का शेवटची 2018 मध्ये शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर 2022 मध्ये 'कला' चित्रपटात तिने एक छोटा कॅमिओ केला होता, पण मुख्य भूमिकेतून ती प्रदीर्घ काळ गायब आहे.

हेही वाचा: Akshay Kumar: शूटिंग पूर्ण होताच अक्षय कुमारवर शस्त्रक्रिया; अभिनेत्याला नेमकं काय झालं?

दिब्येंदु भट्टाचार्य यांचा मोठा खुलासा '

चकदा एक्सप्रेस'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते दिब्येंदु भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपट पूर्णपणे तयार आहे. ते म्हणाले, "चित्रपट पूर्ण झाला असून त्याचे डबिंगही पूर्ण झाले आहे. हे सर्व आमच्या हातात नसते, पण चित्रपट सेन्सॉरमध्येही अडकलेला नाही." जेव्हा त्यांनी दिग्दर्शकाशी याबद्दल चर्चा केली, तेव्हा दिग्दर्शकालाही चित्रपट कधी प्रदर्शित होईल, याबद्दल ठोस माहिती नसल्याचे समोर आले.

झूलन गोस्वामींच्या भूमिकेसाठी घेतली मेहनत

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केले आहे. या भूमिकेसाठी अनुष्काने क्रिकेटच्या बारकाव्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. झूलन गोस्वामींसारख्या दिग्गज क्रिकेटपटूचा प्रवास पडद्यावर साकारण्यासाठी तिने प्रत्यक्ष मैदानावर घाम गाळला होता. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचे प्रदर्शन होणार होते, परंतु आता हा सिनेमा का रखडला आहे, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे, खुद्द झूलन गोस्वामींनाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणतीही कल्पना नाही. अनुष्का शर्मानेही आजवर या चित्रपटाच्या विलंबावर अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. चित्रपट तयार असूनही तो प्रेक्षकांसमोर का येत नाहीये, यामुळे चित्रपटसृष्टीत विविध चर्चांना उधाण आले आहे. अनुष्का पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात 'चकदा एक्सप्रेस'च्या माध्यमातून दिसेल की नाही, हा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे.

हेही वाचा: Tamilnadu Government Formation: 'पुन्हा निवडणूका घ्या...', थलापती विजय मुख्यमंत्री होण्याआधीच Zohoच्या सह-संस्थापकांची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या