धुळे : धुळ्यात मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप वंतित बहुजन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यामुळे वंचित बहुजन पक्ष आणि भाजपा या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिवाजी हायस्कूल परिसरात दाखल होत दोन जणांना ताब्यात घेतले.