कल्याण आणि डोंबिवली शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्यासंबंधात एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नागरिकांना येत्या काही दिवसात पाण्याची मोठी साठवणूक करावी लागणार आहे. कारण शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवणार आहे. नेमके किती दिवस ठप्प राहणार असून कोणत्या भागांना फटका बसेल, याबाबत सविस्तर आलेली माहिती जाणून घ्या.
किती तारखेला राहणार बंद
वर्षभरात कल्याण-डोंबिवली महानगपालिकेमार्फत नागरिकांना सुरळीत तसेच स्वच्छ पाणीपुरठा उपलब्ध करुन देणे असते.त्यामुळेच वेळोवेळी अनेक जलशुद्दीकरण केंद्रांमधील उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती ही केली जाते. याच कारणामुळे कल्याण-डोंबिवली महानगपालिकेच्या क्षेत्रांतर्गत येत असलेल्या बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा येथील असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या मंगळावरी, दिनांक 27 ऑक्टोबर 206 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंद राहणार आहे.
‘या’ भागांना बसणार फटका
सलग 18 तास कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याच शटडाऊनमुळे कल्याण-डोंबिवली शहर तसेच कल्याण ग्रामीण विभागातील अनेक भागांवर थेट परिणाम होईल. ज्यामध्ये प्रामुख्याने कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि कल्याण ग्रामीणमधील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी परिसरातील काही गावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election