EVM ला विरोध, पण बॅलेट पेपरवर मतदान होऊनही काँग्रेसचा दरुण पराभव; 42 पैकी तब्बल 32 जागांवर भाजपचा दणदणीत विजय

एकीकडे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी लावून धरली जात असतानाच, दुसरीकडे आसाममधून काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

EVM ला विरोध, पण बॅलेट पेपरवर मतदान होऊनही काँग्रेसचा दरुण पराभव; 42 पैकी तब्बल 32 जागांवर भाजपचा दणदणीत विजय
BJP Congress

देशभरात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (EVM) वापरावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित करत आगामी सर्व निवडणुका कागदी मतपत्रिकांवर (Ballot Paper) घेण्याची मागणी लावून धरली आहे. याच मागणीसाठी आणि सध्या सुरू असलेल्या एसआयआर (SIR) प्रक्रियेच्या विरोधात मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा काढला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक वरिष्ठ खासदार व नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आसामच्या सिलचर महानगरपालिकेत मतपत्रिकांवर मतदान

एकीकडे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी लावून धरली जात असतानाच, दुसरीकडे आसाममधून काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आसाममधील सिलचर महानगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे बॅलेट पेपरचा वापर करून पार पडली. या निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने 42 जागांपैकी तब्बल 32 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. याउलट, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेस पक्षाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

हेही वाचा – शिवसेना चिन्ह व अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाने मांडली विधानसभा अध्यक्षांची भक्कम बाजू; मोठ्या युक्तिवादांनंतर..

‘बॅलेट पेपरवरही पराभवच;’ निकालानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा टोला

या निकालांनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी 30 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना सरमा म्हणाले की, काँग्रेस पक्ष आपल्या पराभवाचे खापर कायम ईव्हीएमवर फोडत असतो; मात्र सिलचरमधील निकालाने हे स्पष्ट केले आहे की, जनता कागदी मतपत्रिकांवर मतदान झाले तरीही काँग्रेसला नाकारतच आहे. या पराभवामुळे विरोधी पक्षांच्या ईव्हीएमविरोधी मोहिमेला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number