Sunil Tatkare : ‘मी आणि पटेल यांनीच टीकेचं धनी का व्हायचं?, वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार की नाही?’; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे प्रचंड चिडले

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या शाब्दिक चमकम झाल्याचे समजते. पक्ष नेतृत्वाच्या म्हणजेच अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे तसेच पक्ष एकसंध ठेवणे यात आपण आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आमच्यावर टीका सुरू असताना एकही नेता बचावासाठी […]

Sunil Tatkare : ‘मी आणि पटेल यांनीच टीकेचं धनी का व्हायचं?, वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार की नाही?’; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे प्रचंड चिडले

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या शाब्दिक चमकम झाल्याचे समजते. पक्ष नेतृत्वाच्या म्हणजेच अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे तसेच पक्ष एकसंध ठेवणे यात आपण आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आमच्यावर टीका सुरू असताना एकही नेता बचावासाठी पुढे आला नाही, असा संताप यावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही आमच्या दोघांवर सतत टीका सुरू असताना पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही, असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाल्याचे समजते.

हेही वाचा : Karnataka Politics: कर्नाटकात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत; सिद्धरामय्या देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? चर्चांना उधाण

यावेळी तटकरे म्हणाले की, “पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली, त्यावेळी देखील टीकेच्या तोंडी आम्ही दोघेच गेलो. मात्र इतर कुणीही आमची बाजू मांडली नाही अथवा बचावासाठी पुढे आले नाही. केवळ प्रफुल पटेल आणि मीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही अधिकृत भूमिका घेणार आहे की नाही?” दरम्यान, यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटकरे भुजबळांवर चांगलेच संतापले. भुजबळांना उत्तर देताना तटकरे यांनी, ‘मी आज या विषयावर बोलणारच आणि याबाबत पक्षात पूर्ण स्पष्टता यायला हवी,’ अशी ठाम भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number