Friday, March 13, 2026 10:59:00 PM

Top 5 Electric Scooters : इलेक्ट्रिक स्कूटरवर 'लाईफटाईम' वॉरंटी! बॅटरीच्या टेन्शनमधून ग्राहकांची कायमची सुटका; 'या' 5 कंपन्यांच्या जबरदस्त ऑफर्स

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना ग्राहकांना बॅटरीची मोठी चिंता वाटत असते. बॅटरी खराब झाली तर तिच्या रिप्लेसमेंटचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतो. यावर स्कूटर कंपन्यांनी नवी स्कीम सुरू केली आहे.

top 5 electric scooters  इलेक्ट्रिक स्कूटरवर लाईफटाईम वॉरंटी बॅटरीच्या टेन्शनमधून ग्राहकांची कायमची सुटका या 5 कंपन्यांच्या जबरदस्त ऑफर्स

Top 5 Electric Scooters With Maximum Battery Warranty: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना ग्राहकांना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे 'बॅटरी'ची. बॅटरी खराब झाली तर तिच्या रिप्लेसमेंटचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतो. ग्राहकांची हीच भीती दूर करण्यासाठी आता अनेक कंपन्यांनी बॅटरीवर 8 वर्षांपर्यंत वॉरंटी देण्यास सुरुवात केली आहे, तर काही कंपन्यांनी चक्क 'लाईफटाईम' वॉरंटीचा धमाका केला आहे. जाणून घेऊ, कोणत्या टॉप 5 इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्या सर्वात जास्त वॉरंटी देत आहेत.

1. सिंपल एनर्जी: इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच लाईफटाईम वॉरंटी
बेंगळुरूस्थित 'सिंपल एनर्जी' (Simple Energy) या कंपनीने आपल्या Simple One Gen 2 आणि Simple Ultra मॉडेलसोबत एक नवा बेंचमार्क सेट केला आहे. कंपनीने बॅटरी आणि मोटर या दोन्हीवर Lifetime Warranty जाहीर केली आहे. यामुळे ग्राहकांना बॅटरी रिप्लेसमेंटच्या लाखो रुपयांच्या खर्चापासून कायमची सुटका मिळाली आहे. ज्यांना दीर्घकाळ स्कूटर वापरायची आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

2. ओला इलेक्ट्रिक: 8 वर्षे किंवा 1.25 लाख किमीची सुरक्षा
देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) सर्वप्रथम 8 वर्षांची स्टँडर्ड बॅटरी वॉरंटी देण्यास सुरुवात केली होती. ओला आपल्या S1 Pro, S1 Air आणि S1 X या सर्व मॉडेल्सवर 8 वर्षे किंवा 80,000 किलोमीटरची वॉरंटी देते. विशेष म्हणजे, ग्राहक काही अतिरिक्त शुल्क भरून ही मर्यादा 1.25 लाख किलोमीटरपर्यंत वाढवू शकतात.

हेही वाचा - Electric Scooter : पेट्रोलचा खर्च विसरा! एका चार्जमध्ये 320 किमीपर्यंत धावणाऱ्या 'या' 5 जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत अन् फीचर्स

3. एथर एनर्जी: 'एथर प्रोटेक्ट' अंतर्गत 8 वर्षांचे कवच
आपल्या दर्जेदार इंजिनिअरिंगसाठी ओळखली जाणारी एथर एनर्जी (Ather Energy) आपल्या 'एथर प्रोटेक्ट' (Ather Protect) प्लॅनद्वारे 8 वर्षे किंवा 80,000 किलोमीटरची बॅटरी वॉरंटी देत आहे. एथरची एक खास अट अशी आहे की, जर बॅटरीची कार्यक्षमता (State of Health) 70% पेक्षा कमी झाली, तर कंपनी बॅटरी मोफत बदलून देते. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 'एथर स्टॅक प्रो' सोबत सुमारे 4,999 रुपये अतिरिक्त मोजावे लागतात.

4. रिवर इंडी: स्कूटरमधील 'SUV' वर 8 वर्षांची वॉरंटी
'रिवर इंडी' (River Indie) या आपल्या मजबूत डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या स्कूटरवरही आता 8 वर्षे किंवा 80,000 किलोमीटरची विस्तारित वॉरंटी दिली जात आहे. ही वॉरंटी बॅटरी आणि मोटर या दोन्हीला कव्हर करते. नवीन ग्राहकांसाठी हा प्लॅन उपलब्ध असून, जुन्या ग्राहकांसाठीही अपग्रेडचा पर्याय देण्यात आला आहे. या प्लॅनसाठी ग्राहकांना सुमारे 8,399 रुपये अधिक जीएसटी (GST) इतकी रक्कम द्यावी लागते.

5. लेक्ट्रिक्स ईव्ही: सबस्क्रिप्शन मॉडेलसह 'लाईफटाईम' सुविधा
हरियाणातील गुरुग्रामस्थित लेक्ट्रिक्स (Lectrix EV) या कंपनीने आपल्या LXS 2.0 मॉडेलसाठी एक आगळीवेगळी योजना आणली आहे. त्यांच्या 'बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेल' (BaaS) अंतर्गत ग्राहकांना बॅटरीवर Lifetime Warranty मिळते. येथे ग्राहक बॅटरीशिवाय कमी किमतीत स्कूटर खरेदी करू शकतात आणि बॅटरीसाठी दरमहा सुमारे 999 ते 1,199 रुपयांचे सबस्क्रिप्शन भरतात. बॅटरीमध्ये बिघाड झाल्यास कंपनी ती कोणत्याही प्रश्नाशिवाय मोफत बदलून देते.

हेही वाचा - Affordable Diesel Cars: फॅमिलीसाठी या डिझेल SUV एकदम परफेक्ट! फीचर्स आणि मायलेजमध्ये कोण आहे भारी?


सम्बन्धित सामग्री