Shocking News: जोडीदारासोबत वाद! 7 व्या मजल्यावरून पडून 23 वर्षीय महिला इंजिनिअरचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून पडून 23 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Shocking News: जोडीदारासोबत वाद! 7 व्या मजल्यावरून पडून 23 वर्षीय महिला इंजिनिअरचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

Janani Software Engineer 7th floor fall: एका खाजगी को-लिव्हिंग PG मध्ये रविवारी दुपारी घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून पडून 23 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. बंगळुरू येथील व्हाईटफिल्ड परिसरात ही घटना घडली. मृत तरुणीची ओळख जननी पेरुमल अशी पटली असून ती मूळची पुडुचेरी येथील उलाईवक्कल भागातील रहिवासी होती. ती 'सोसायटी जनरल' (Societe Generale) या खाजगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. 

झाडाच्या फांद्यांमुळे तरुणाचा वाचला जीव; रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव मणिकवेलू (Manichavelu) असून तोही पुडुचेरीचा रहिवासी आहे आणि एका लॉजिस्टिक कंपनीत काम करतो. 7 व्या मजल्यावरून खाली पडताना मणिकवेलू सुदैवाने झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला. झाडाच्या फांद्यांमुळे जमिनीवर पडण्याचा वेग कमी झाल्याने त्याचा जीव वाचला. घटनेनंतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा – Railway Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा धक्का; प्रवासादरम्यान 'या' 6 चुका केल्यास भरावा लागणार दुप्पट दंड

टोकाचा वाद अन् गच्चीवरून थेट खाली उडी; पोलिसांचा संशय
पोलीस तपासातील प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी जननी आणि मणिकवेलू यांच्यात जोरदार वाद झाला होता. वाद टोकाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या जननीने इमारतीच्या गच्चीवर जाऊन टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. तिने गच्चीच्या टोकावरून खाली उडी मारताना मणिकवेलूलाही सोबत ओढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामुळे दोघेही समतोल गमावून 7 व्या मजल्यावरून थेट खाली कोसळले.  

पोलीस तपासाची चक्रे वेगाने; वादाचे मूळ शोधण्याचे आव्हान
घटनेची माहिती मिळताच व्हाईटफिल्ड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस दोन्ही कुटुंबांशी व PG मधील इतर लोकांशी चौकशी करत आहेत. हा केवळ वाद होता की यामागे काही अन्य कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे. जखमी मणिकवेलूची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतरच या घटनेमागील खरे सत्य समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – Justice Surya Kant: 'वर्षाला होणाऱ्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून पृथ्वीवरील प्रत्येकाला मिळू शकतो लॅपटॉप…'; न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं मोठं वक्तव्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number