नोव्हेंबरचा पहिला दिवस ठरला महत्त्वाचा! देशभरात लागू झाले नवे नियम, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?

Major Rule Changes from November 1 : 1 नोव्हेंबरपासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. नेमके काय बदलले, जाणून घ्या.

नोव्हेंबरचा पहिला दिवस ठरला महत्त्वाचा! देशभरात लागू झाले नवे नियम, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
Rule Changes from November 1

आजपासून देशभरात सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे 5 अतिशय महत्त्वाचे बदल लागू झालेले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या बदलांचा थेट परिणाम हा बँकिंग, पेन्शन, इंधन तसेच टोलच्या नियमांवर होणार आहे, तर काही बदलांमुळे नागरिकांच्या खर्चात वाढ ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे नवे नियम कोणते आहेत आणि त्याचा नेमका परिणाम काय सर्वसामान्यांवर होणार, हे जाणून घ्या.

महागाईचा झटका
मिळालेल्या माहितीनुसार, सगळ्यात मोठा बदल हा इंधनाच्या किमतीमध्ये झालेला आहे. मुंबई आणि एमएमआरमध्ये CNG हा एक रुपयाने महाग झालेला आहे असून, आता थेट 90 रुपये प्रति किलो दर झालेला आहे. तर LPG सिलेंडरच्या सबसिडीचे ही नियम आजपासून बदलले गेले आहेत.

हेही वाचा – महागाईचा पुन्हा भडका! CNG च्या दरात पुन्हा वाढ; आता किती पैसे मोजावे लागणार?

सरकारी पेन्शनधारकांसाठी नवा नियम
दुसरीकडे, पेन्शनधारकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 80 वर्षांखालील असलेल्या सरकारी निवृत्तीवेतनधारक आदपासून 30 नोव्हेंबरपर्यंत आपले हयात प्रमाणपत्र जमा करु शकतात. वेळेमध्ये जमा न केल्यास तुमची पेन्शन ही रोखली जाऊ शकते. 80 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ही सुविधा 1 ऑक्टोबरपासूनच सुरू आहे.

टोलचा खर्च कमी होणार?
दिलासा देणारी बातमी ही FASTag बाबत आहे. जिथं टोल नाक्यापासून साधारण 20 किमी अंतरात राहत असलेल्या स्थानिकांना वार्षिक लोकल पास मिळणार आहे. नगरपालिका हद्दीबाहेर टोल असल्यास 1500 रुपये आणि हद्दीत असेल तर 3000 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number