मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे, आता रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणे महाग होणार आहे. भाडेवाढ लागू झाल्यानंतरच मीटर रिकॅलिब्रेशनच्या कामाने वेग घेतला आहे. वडाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत 2,868 हून अधिक रिक्षा-टॅक्सींचे मीटर हे नवीन दरानुसार अपडेट करण्यात आलेले आहेत.ज्यामध्ये सर्वाधिक संख्या ही रिक्षांचीच आहे, तर मुंबई सेंट्रला आरटीओमध्ये पाहिलं तर 3,000 हून अधिक टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे.
इंधन आणि देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढल्याने संघटनांनी भाडेवाढीची मागणी ही केलेली होती. त्यानुसार 1 सप्टेंबरपासूनच रिक्षाचे किमान भाडे हे 1 रुपयाने वाढवून 26 वरुन 27 रुपये, तर दुसरीकडे काळी-पिवळी टॅक्सीचे भाडे हे 2 रुपयांनी वाढवून 31 वरुन 33 रुपये करण्यात आलेले आहे. हे दर पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी लागू असणार आहे.मीटरमध्ये बदल करण्यासाठी चालकांना साधारण 700 रुपयांचा खर्च येत आहे. मीटर चिपसाठी 280, तर दुरुस्तीसाठी 275, चाचणीसाठी 120 आणि सीलसाठी 25 रुपये आकारले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.