केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील असलेल्या विंडफॉल टॅक्सबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. काल रात्री उशिरा घेतलेल्या या निर्णयानुसार आता पेट्रोलच्या निर्यातीवरील कर हा वाढवण्यात आलेला आहे, तर डिझेलवरील कर हा कमी करण्यात आला आहे.
दिवाळीआधी इंधनाबाबत केंद्राची मोठी घोषणा
सरकारच्या नव्या आदेशानुसार, पेट्रोलच्या निर्यातीवर आता प्रति लिटर 2.50 रुपये इतके विंडफॉल टॅक्स लागणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. याआधी हा कर फक्त 0.50 रुपये होता. म्हणजे आता 2 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे डिझेलवरील निर्यात कर हा 16 रुपयांवरुन कमी करत तो 8.50 रुपये प्रति लिटर केला आहे. एटीएफ म्हणजेच विमानाच्या इंधनावरील करात कोणताही बदल केला नाही. हे नवे दर 16 ऑक्टोबर अर्थात आजपासून लागू झाले आहेत.
सामान्यांवर कोणता परिणाम?
हा निर्णय होताच सर्वसामान्य प्रश्न पडलेला आहे ,तो म्हणजे याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार का?. खरं तर सरकारने स्पष्ट केले आहे की या निर्णयाचा देशांतर्गत किरकोळ किमतींवर थेट परिणाम होणार नाही. देशात विकल्या जात असलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील असलेल्या करात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे दिल्लीतही आजही पेट्रोचे दर हे 102.12 रुपये असून मुंबई, पुण्यातही दस स्थिर आहेत.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर