बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि इतर अनेक गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून लोकांनी अंघोळ केली नाही. बोंडगाव, कठोरा, हिंगणा, भोनगाव अशा अनेक गावांमध्ये अचानक लोकांना केस गळती सुरू झाल्याने त्यांच्या टक्कल पडू लागले आहेत. या गावांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणावर आढळल्याने या पाण्याचे वापर करणे धोकादायक ठरले आहे. प्रशासनाने या पाण्याला वापरण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट करून लोकांना सांगितले आहे, मात्र पर्यायी पाण्याची व्यवस्था न करता प्रशासनाने हातावर हात ठेवला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
👉👉 हे देखील वाचा : बुलढाण्यातील शासकीय वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत धक्कादायक प्रकार
गावकऱ्यांना अंघोळीची साधनं उपलब्ध नाहीत, कारण पर्यायी पाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना शरीरावर दुर्गंधी निर्माण होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावातील लोकांची मानसिक आणि शारीरिक स्थिती खूपच वाईट झाली आहे.
केस गळती प्रकरणाची केंद्रीय मंत्र्यांकडून दखल
केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज या केस गळतीच्या प्रकरणाची दखल घेतली असून, त्यांनी प्रभावित गावांना भेट देण्याची घोषणा केली आहे. या गंभीर आजाराच्या प्रकरणात आरोग्य विभागाने अद्याप मुख्य कारण शोधण्यास अपयश मिळवले आहे.
केस गळतीच्या प्रकरणात झपाट्याने वाढ
केस गळतीच्या समस्येचे प्रमाण आता झपाट्याने वाढत आहे आणि यामुळे संपूर्ण देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. गावात टक्कल वायरसच्या भीतीने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांचे जीवन आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.