बुलढाणा : चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृहात एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. वसतिगृह अधीक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. आरोपीचे नाव विनायक देशमुख असून, तो पेठ येथील रहिवासी आहे.
पिडीत अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार केली की, आरोपीने दोन महिने सतत अत्याचार केले. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६८, ११८ (१) आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा
सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर चिंता:
वसतिगृहाचे सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता असून, अशा धक्कादायक घटनांमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. आरोपी वसतिगृह अधीक्षक विनायक देशमुख वर विविध गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी न्याय मागितला असून, संबंधित यंत्रणांकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे.
👉👉 हे देखील वाचा : पुण्यात कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा ; सुप्रिया सुळे यांची पोलिसांवर टीका