Friday, February 13, 2026 06:30:14 PM

Munciple Corporation Election 2026 Result : '51 'टक्क्यांच्या वर भाजपचे उमेदवार दिसतील'; चंद्रशेखर बावनकुळेंची व्यक्त केला विश्वास

मुंबई महापालिकांसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत असून महायुतीसह भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

munciple corporation election 2026 result   51 टक्क्यांच्या वर भाजपचे उमेदवार दिसतील चंद्रशेखर बावनकुळेंची व्यक्त केला विश्वास

मुंबई महापालिकांसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत असून महायुतीसह भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बहुतांशी महापालिकांवर भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. तसेच संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या या विजयावर आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या पराभवावर भाष्य टीका केली आहे. 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे 

डबल इंजिन सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचे सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, विकसित महाराष्ट्र बनवू शकतं, ग्रामीण भागातूनही असाच निकाल मागच्या वेळी आला होता. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, विकासाचं मत आहे. सध्या हाती आलेला कल आता असाच सुरू राहील आणि महायुती दोन तृतियांश बहुमताने आणि 51 टक्के नगरसेवकांसह भाजप विजय मिळवले असं मला वाटतं. या पराभवाचं एकच कारण आहे. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचं व्हिजन,एकनाथ शिंदे आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकारवर सरकारने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. दरम्यान या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्यासोबत होती. मात्र या आघाडीला आता मुंबईकरांनी नाकारल्याचे समोर आले आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या