Monday, May 11, 2026 10:40:15 AM

Devendra Fadnavis : 'ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल मला फोन करून...' बारामतीत फडणवीसांचा मोठा खुलासा; सुनेत्रा वहिनींना दिला भक्कम पाठिंबा

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या विकासकामांचा गौरव केला. तसेच, अजितदादांप्रमाणेच सुनेत्रावहिनीही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खमकेपणाने काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

devendra fadnavis  ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल मला फोन करून बारामतीत फडणवीसांचा मोठा खुलासा सुनेत्रा वहिनींना दिला भक्कम पाठिंबा

Devendra Fadnavis Baramati Speech : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा खुलासा केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल स्वतः फोन करून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. महाविकास आघाडी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून हा पाठिंबा केवळ राजकीय नसून तो अजितदादांच्या स्मृतीचा आदर करणारा आहे, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. या सहकार्याबद्दल त्यांनी जाहीर सभेत शरद पवारांचे मनापासून आभार मानले.

अजितदादांच्या आठवणीने सर्वांचे डोळे पाणावले
सभेच्या सुरुवातीला व्यासपीठावर दिवंगत नेते अजित पवार यांच्या जीवनावर आधारित एक विशेष चित्रफित (Video Documentary) दाखवण्यात आली. ही चित्रफित पाहून संपूर्ण सभास्थळी शांतता पसरली आणि सुनेत्रा पवार यांच्यासह मंचावरील अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या पतीच्या संघर्षाचा प्रवास पडद्यावर पाहताना सुनेत्रा वहिनी हुंदके देऊन रडल्या. या भावनिक क्षणानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार यांनी, "मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

फडणवीसांचे बारामतीकरांना आवाहन
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या विकासकामांचा गौरव केला. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे अजितदादा राज्याच्या विकासाचा गाडा वेगाने ओढत होते, त्याच खमकेपणाने सुनेत्रा वहिनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. बारामतीच्या ३ पिढ्या अजितदादांच्या विचारांशी मनापासून जोडलेल्या आहेत आणि ही कौटुंबिक नाळ कधीही तुटू शकत नाही. सुनेत्रा पवार या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - Sharad Pawar Post: 59 वर्षांच्या परंपरेत खंड! शरद पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी करणार नाहीत मतदान

विमानतळावर जंगी स्वागत आणि दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी 4:00 PM वाजता बारामती विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार राहुल कुल, वासुदेव काळे आणि प्रदीप गारटकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सभेला जाण्यापूर्वी फडणवीस यांनी थेट अजित पवार यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि पुष्पचक्र अर्पण केले. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असली, तरी त्यांच्या विचारांचा वारसा सुनेत्रा वहिनी समर्थपणे पुढे नेतील, असे त्यांनी नमूद केले.

भावनिक आवाहन आणि विजयाचा निर्धार
अजितदादांनंतर राज्याने आणि बारामतीकरांनी आपल्याला व आपल्या दोन्ही मुलांला (जय आणि पार्थ) जे प्रेम दिले, त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी सर्वांचे आभार मानले. "दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच माझी आताची सर्वात मोठी जबाबदारी आहे," असे त्यांनी भावूक होत सांगितले. सांगता सभेतील हे भावनिक वातावरण आणि महायुतीसह महाविकास आघाडीचा मिळालेला पाठिंबा पाहता, बारामतीची ही पोटनिवडणूक राजकीय संघर्षापेक्षा आदरांजलीच्या दिशेने झुकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Supriya Sule-Sunetra Pawar : बारामतीत ताई-वहिनींचा 'अबोला'? सुप्रिया सुळेंनी व्यासपीठावर सुनेत्रा पवारांशी संवादच नाही साधला; नेमकं काय घडलं?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या