CJP Nationwide Protest: कॉकरोच जनता पार्टी आक्रमक; पोलीस अत्याचाराविरोधात उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक

या मोहिमेद्वारे देशभरातील पोलीस अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांशी कटिबद्धता दर्शवणे हा पक्षाचा मुख्य उद्देश आहे.<br/>
CJP Nationwide Protest: कॉकरोच जनता पार्टी आक्रमक; पोलीस अत्याचाराविरोधात उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक

 CJP Nationwide Protest:  ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) पोलीस अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी देशभर व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिजिटल पोस्टर जारी करत शुक्रवारी, 24 जुलै रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेद्वारे देशभरातील पोलीस अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांशी कटिबद्धता दर्शवणे हा पक्षाचा मुख्य उद्देश आहे.

आंदोलनासाठी ‘SOP’ आणि विद्यार्थ्यांचा सहभाग
“प्रत्येक जिल्हा. एक दिवस. एक मागणी” या घोषवाक्याखाली हे आंदोलन आयोजित केले जात आहे. आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करताना CJP कडून एक मानक कार्यपद्धती (SOP), आवश्यक साहित्य आणि निवेदनाची प्रत जारी करण्यात आली आहे. स्थानिक आयोजकांनी प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे निर्देश पक्षाने दिले आहेत. याशिवाय, विद्यार्थी संघटना आणि इतर सामाजिक संस्थांनी एकत्र येत आंदोलनाच्या ठिकाणी पीडितांचे प्रश्न मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांचे उपोषण 25 व्या दिवशीही सुरू; मेदांता रुग्णालयात उपचार
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP कडून सातत्याने धरणे आंदोलन सुरू असून, त्याला विविध विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या 26 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सध्या गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘आम्ही चर्चेला तयार, पण समोरून प्रतिसाद नाही’; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे मोठं विधान

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी
NEET परीक्षेशी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधत CJP ने सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही पक्षाची मुख्य मागणी आहे. केंद्र सरकारकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी दिल्लीसह देशाच्या विविध भागात आंदोलनाची तीव्र पडसाद उमटत आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version