सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. खरं तर जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या या डीए वाढीकडे सध्या तब्बल 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे.
महागाई भत्त्यात वाढ होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 टक्क्यांच्या दराने DA मिळत आहे. जर 3 टक्के वाढ करण्यात आली तर हा आकडा थेट 63 टक्क्यांवर जाऊ शकतो. जानेवारी ते जून 2026 च्या CPI-IW निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
जून 2026 मध्ये पाहिलं तर हाच निर्देशांत 151.90 अंकांवर पोहोचला होता, त्यानुसार डीए 63.75 टक्के पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सहा ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे कर्मचारी वाट पाहत आहेत. मात्र जुना ट्रेंड पाहता ही घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर होण्याची मोठी शक्यता आहे.
पगारात किती वाढ होणार?
जर बेसिक पगार 18,000 असेल तर डीए 10,800 वरुन थेट 11,340 होईल म्हणजे साधारण 540 रुपयांचा फायदा होणार आहे. जर बेसिक पगार 25,000 हजार असेल तर डीए हा 15,000 वरुन 15,750 होईल म्हणजे 750 रुपयांचा फायदा. जर घोषणा उशिरा झाली तरी जुलै ते ऑक्टोबरची थकबाकी एकत्र मिळेल. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेवरच अवलंबून असेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.