वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठीच्या पासिंगच्या असलेल्या टक्केवारीमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने याबाबतचे नवीन निमय तयार केले आहेत. लवकरच हे नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती आहे. या नव्या नियमामुळे लायसन्स मिळवणे आता अधिक सोपे होणार की कठीण होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
नव्या नियमांमध्ये चाचणी पद्धतीतही काही बदल अपेक्षित आहेत. यासह आणखी एक दिलासादायर निर्णय प्रस्ताविक केला आहे. आधार पडताळणीद्वारे ऑनलाइन उपलब्ध असलेल्या काही सेवांवरील शुल्क हे माफ करण्याचाही प्रस्ताव सरकारने दिलेला आहे. ज्यामध्ये लायसन्स कार्डवरील नाव आणि पत्ता बदलण्यासारख्या महत्त्वाच्या सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला असल्यास नागरिकांना आता घरबसल्याच मोफत नाव-पत्ता दुरुस्ती करता येणार आहे.