एकनाथ शिंदेंचा महायुतीला धक्का?, सलग दुसऱ्यांदा बैठकीला दांडी; नाराजीचे कारण काय?

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याने महायुतीतील संभाव्य मतभेदांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमागील नेमके कारण स्पष्ट झाल्याशिवाय नाराजीच्या चर्चांना दुजोरा देता येणार नाही.
एकनाथ शिंदे
Mahayuti Alliance,

एक मोठी बातमी समोर आलेली आहे. महायुतीमधील तणाव वाढल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. कारण आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाडीबीटीट्या बैठकीला गैरहजर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाडीबीटीची बैठक होती. मात्र शिंदे गैरहजर राहिल्याने नाराजीच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलेले आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार होती. अमरावती आणि पुणे विधानपरिषद निवडणुकीला घेऊन शिवसेना भाजपामध्ये घमासान रंगल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. त्यामुळे यापूर्वीही पाहिले तर एकनाथ शिंदे हे दुष्काळाच्या काल झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते. त्यावरुनच महायुतीमध्ये तणाव आहे का, अशा चर्चा रंगत आहेत.

मात्र, सगळ्यावरती यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की, मी कुठल्याही प्रकारे नाराज नाही. मी उपमुख्यमंत्री असल्याने अनेक कामांमध्ये व्यस्त असू शकतात. त्यामुळेच बैठकांना जाण होत नाही असं स्पष्टीकरण, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं होते. मात्र, पुन्हा एकदा अवघ्या काही दिवसांमध्ये एकनाश शिंदे हे महाडीबेटीच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आल्यांच पाहायला मिळतं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version