‘CJP च्या आंदोलनामागे एलॉन मस्क…’; भाजपच्या माजी खासदाराचा दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'लेहरा दो तिरंगा' आंदोलनावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

‘CJP च्या आंदोलनामागे एलॉन मस्क…’; भाजपच्या माजी खासदाराचा दाव्याने राजकीय चर्चांना उधाण
Former BJP MP’s claim about Elon Musk

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या आंदोलनाच्या काही तास आधीच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. या संपूर्ण आंदोलनामागे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळप्रमाणेच भारतातही राजकीय अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्यासाठी परदेशी शक्तींकडून मोठे षड्यंत्र रचले जात असल्याचा घणाघात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

अमेरिकन उद्योगपतींच्या इशाऱ्यावर देशात आंदोलने

प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, दिल्लीतील हे आंदोलन थेट एलॉन मस्क यांच्या इशाऱ्यावर चालवले जात आहे. परदेशी उद्योगपतींना भारताच्या अटी आणि शर्तींवर नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या अटींवर व्यवसाय करायचा आहे. केंद्र सरकारने त्यांच्या या दबावाला विरोध केल्यामुळेच ते भारतातील अशा आंदोलनांना आर्थिक आणि रसद पुरवठा करून चिथावणी देण्याचे काम करत आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाला धमकावण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. आपल्या या दाव्यांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही प्रत्यक्ष पुरावा सादर केलेला नाही.

सेंट्रल पार्कमध्ये सायंकाळी 5 वाजता आंदोलन

दुसरीकडे, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:00 वाजता कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क परिसरात हातात राष्ट्रध्वज घेऊन एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाला आम आदमी पक्षासह डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी (AISA आणि SFI) जाहीर पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिल्ली पोलिस, सीआरपीएफ (CRPF) आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) चे तब्बल 27 हजार जवान संपूर्ण शहरात तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा – प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायालयाने थेट घरावर…

आंदोलनाच्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी म्हणून प्रशासनाने दिल्लीतील अनेक संवेदनशील भागांमध्ये कलम 163 लागू केले आहे. या नियमानुसार शहरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र जमण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रमुख चौकांमध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण दिल्ली शहर सध्या छावणीचे रूप धारण करत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number