तब्बल 24 तासांनंतर CJP च्या तिनही नेत्यांची अखेर सुटका; ‘पुन्हा आंदोलन करणार नाही’, या हमीपत्रावर घेतली स्वाक्षरी

सीजेपी नेते अभिजित दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना रविवार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.
abhijeet dipake, saurav das and ashutosh ranka
abhijeet dipake, saurav das and ashutosh ranka

नवी दिल्ली : जवळपास 24 तास ताब्यात ठेवल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) नेते अभिजित दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना रविवार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने अभिजीत, सौरव आणि आशुतोष यांची अखेर सुटका केली आहे. याची माहिती सीजेपीची प्रवक्ता रत्ना सिंग हिने एक्स पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या तिघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली असून आम्ही आंदोलन करणार नाही, असे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांची सुटका झाल्याचे समजते.

दरम्यान, जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युट्युबर ध्रुव राठी यांची शनिवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.

हेही वाचा : देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या तीन तरुणांची जीवनज्योत विझली; आयशरने दुचाकीला दोन किमी फरफटत नेलं

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल, शनिवारी दिल्लीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे होणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. ताब्यात घेतल्यानंतर या तिघांना कुठे नेण्यात आले आणि त्यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार, याबाबत सविस्तर माहिती उघड झाली नव्हती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version