पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा कळस? धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसहीत थेट रस्त्यावर पडला; Video Viral

पिंपरी-चिंचवडमध्ये वाय सी एम हॉस्पिटलच्या धावत्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटल परिसरात एक रुग्ण चक्क खाली पडल्याची घटना घडली असून, यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा कळस? धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसहीत थेट रस्त्यावर पडला; Video Viral
Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाय सी एम हॉस्पिटलच्या धावत्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटल परिसरात एक रुग्ण चक्क खाली पडल्याची घटना घडली असून, यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेची दृश्य काही सजग नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपून रुग्णवाहिका चालकाला जाब विचारला आहे.

मात्र या घटनेमुळे वायसीएम हॉस्पिटलच्या कारभार आणि रुग्णवाहिकेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्ण पडल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णवाहिका चालक आणि एक पोलीस कॉन्स्टेबल परत आल्याचं पाहायला मिळत आहे. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिका चालकावर आणि वाय सी एम हॉस्पिटल प्रशासनावर योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस विभागाकडे केली आहे.

हेही वाचा- देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या तीन तरुणांची जीवनज्योत विझली; आयशरने दुचाकीला दोन किमी फरफटत नेलं

सुदैवाने या दुर्घटनेत रुग्ण जास्त गंभीर झालं नसल्याचं प्राथमिक चित्रात दिसत आहे. त्यावर पुन्हा रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात येत आहेत. रुग्णवाहिकेमध्ये रुग्णाच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित कर्मचारी आणि चालकावर असते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

दरम्यान, या घटनेमुळे वायसीएम रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का? तसेच पोलीस विभागाकडून या घटनेची चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number