FDA Action : FDA चा मोठा छापा! जास्त दूधासाठी म्हशींना दिली जाणारी शेकडो इंजेक्शन्स जप्त; जनावरांसह मानवी आरोग्याच्या जीवाशी खेळ

आतापर्यंत अनेक कंपन्या, दुकांनाचा परवानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने रद्द केला आहे. अशातच उल्हासनगरमध्ये एका म्हशीच्या गोठ्यावर एफडीएची मोठी धाड पडली आहे.

FDA Action :  FDA चा मोठा छापा! जास्त दूधासाठी म्हशींना दिली जाणारी शेकडो इंजेक्शन्स जप्त; जनावरांसह मानवी आरोग्याच्या जीवाशी खेळ

अन्न औषध प्रशासन विभागाने 1 एप्रिल 2026 पासून कारवाईचा मोठा धडाका जिल्ह्यात सुरू केला. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) सूत्रे हाती घेताच राज्यात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत अनेक कंपन्या, दुकांनाचा परवानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने रद्द केला आहे.  डेअरी आणि खाद्यदुकानांवर धाडसत्र राबवल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न व ओषध प्रशासनाची पोहोच थेट गायी म्हशींच्या गोठ्यात पोहचली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी याच्या म्हशीच्या गोठ्यावर एफडीएची मोठी धाड पडली आहे. उल्हासनगरमध्ये म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिली जाणारी आणि शासनाने बंदी घातलेली तब्बल 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स एफडीएच्या पथकाने जप्त केली आहेत. म्हशींनी जास्त दूध द्यावे म्हणून म्हशींना जादा दूधासाठी ऑक्सिटोसीनचा डोस दिला जात होता. 

हेही वाचा- FDA Action On KEM Hospital : मुंबईतील KEM रुग्णालयाच्या कँटीनचा परवाना रद्द; स्वच्छतेअभावी FDA ची धडक कारवाई

हे इंजेक्शन प्रतिबंधित आहेत. हे ऑक्सिटोसिन इंजेक्शन जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. त्याचसोबत हे दुध प्यायल्याने लहान मुलांवर आणि गरोदर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे या औषधाच्या विक्रीवर आणि वापरावर शासनाने कायद्याने पूर्णपणे बंदी घातलेली आहे. असं असताना देखील बेकायदेशीरपणे औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी आणि जनावरांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी संबंधित गोठा चालकावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number