Monday, November 17, 2025 07:02:45 AM

Gold Price Crash India 2025: सोन्याच्या किमतीत तुफान वाढ, परंतु आता होणार मोठी उलटफेर? जाणून घ्या तज्ज्ञांची भविष्यवाणी

सोन्याच्या किमतीत वाढ; 4,000 डॉलर ओलांडल्यानंतर मार्केटमध्ये उलटफेर होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला.

gold price crash india 2025 सोन्याच्या किमतीत तुफान वाढ परंतु आता होणार मोठी उलटफेर जाणून घ्या तज्ज्ञांची भविष्यवाणी

Gold Price Crash India 2025: सोन्याच्या बाजारात सध्या भूकंपासारखा घडामोडींचा काळ सुरु झाला आहे. जागतिक सुवर्ण परिषद (WGC) च्या ताज्या अहवालानुसार, अमेरिकन बाजारात सोन्याचा वायदा भाव प्रति औंस(वजन मोजण्याचे आंतरराष्ट्रीय प्रमाण)  4,014.60 डॉलर गाठल्यानंतर थोडे थांबले असले तरी, भारतीय सराफा आणि वायदा बाजारात ही किमत ऐकून सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये धडकी भरली आहे. या उच्चांकी दरवाढीनंतर तज्ज्ञांनी अलर्ट जारी केला आहे, आणि अनेकांनी अल्पावधीत सोन्याच्या किमतीत करेक्शन होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सोन्याची किमत 2025 मध्ये उंचावर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये सोन्याचा भाव 12 टक्के वाढून प्रति औंस 3,825 डॉलर  झाला होता तर, ऑक्टोबरमध्ये 4,000 डॉलरच्या गाठेजवळ पोहोचला. अमेरिकेत सोन्याचे वायदा भाव इंट्रा-डे उच्चांक 4,014.60 डॉलर गाठल्यानंतर 4,004.40 डॉलर प्रति औंसवर बंद झाले. यावर्षी सोन्याच्या किमती सुमारे 50 टक्के वाढल्या आहेत, तर अमेरिकन डॉलर निर्देशांक 10 टक्के घसरल्यामुळे सोन्याच्या दरवाढीला बळ मिळाले आहे.

हेही वाचा: UPI Payment Safety: ऑनलाइन फ्रॉड टाळण्यासाठी SEBI ने उचललं मोठं पाऊल; UPI पेमेंट करण्यापूर्वी वापरा 'हे' टूल्स

WGC च्या अहवालानुसार, अल्पावधीत सोन्याचे overbought (जास्त खरेदी झालेली) स्थिती दिसत आहे. म्हणजेच, बाजारात जास्त खरेदी झाल्यामुळे लवकरच काही प्रमाणात किमतीत समायोजन होऊ शकते. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सोन्याची किंमत अजूनही आकर्षक आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, मजबूत ETF गुंतवणूक आणि कमकुवत डॉलर सोन्याच्या तेजीला चालना देत आहेत, परंतु अल्पावधीत बाजारात थोडा स्थिरता पाहायला मिळू शकते.

भारतीय गुंतवणूकदारांसाठी देखील सध्या सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. सणासुदीत आणि उत्सवांच्या काळात सोन्याची मागणी अधिक वाढते, त्यामुळे किंमती अल्पकालीन बदलांमुळे चढ-उतार होऊ शकतात. तज्ज्ञांचा सल्ला आहे की, अल्पकालीन नफा मिळवण्यापेक्षा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणारे गुंतवणूकदार सुरक्षित राहतील.

सोन्याच्या किमतींवरील प्रभाव करणारे मुख्य घटक म्हणजे कमकुवत डॉलर, भू-राजकीय अस्थिरता, आर्थिक अनिश्चितता आणि महागाई. ज्या वेळी अमेरिकन डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्याची तेजी थोडी मंदावू शकते, तर गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे.

दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहता, सोनं अद्याप विश्वासार्ह मालमत्ता मानली जाते. जगभरातील स्टॉक आणि बाँड मार्केटमध्ये सोन्याचा वाटा कमी असला तरी, आर्थिक संकट किंवा बाजारातील अनिश्चिततेच्या काळात सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून काम करते. त्यामुळे अल्पकालीन उतार-चढाव असला तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सोनं फायदेशीर ठरते.

एकंदरीत, सोन्याचा झगमगाट कमी होणार का की अजून वाढणार? हे पाहण्यासाठी बाजाराच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. अल्पकालीन उलटफेर असला तरी, दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूकदारांसाठी सोनं अजूनही भरोसेमंद पर्याय राहील.


सम्बन्धित सामग्री