Monday, February 09, 2026 02:53:06 PM

Gold Rate : काय सांगताय सोने-चांदीच्या दरात मोठी घट होणार? सरकारच्या निर्णयाचा परिणाम; सोन्याचे दर 1 लाख 60 हजार...

सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असताना सरकारच्या एका निर्णयामुळे सोने खरेदी करताना सर्वसामान्यांच्या डोक्यावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.

gold rate  काय सांगताय सोने-चांदीच्या दरात मोठी घट होणार सरकारच्या निर्णयाचा परिणाम सोन्याचे दर 1 लाख 60 हजार

सोन्या-चांदीच्या किमतींनी गेल्या काही दिवसांत उच्चांकी पातळी गाठल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. अशातच सरकारच्या एका निर्णयामुळे सोने खरेदी करताना सर्वसामान्यांच्या डोक्यावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. सरकारने सोने आणि चांदीवरील आयात किमती कमी करण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार आयातीवरील शुल्क कपात तत्काळ लागू करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती अद्याप त्यांच्या उच्च पातळीच्या जवळ असल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात सध्या केवळ किंचित घट होण्याची शक्यता आहे. मात्र, या निर्णयाचा परिणाम येत्या काळात दिसून येऊ शकतो आणि सोने-चांदीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने सोने आणि चांदीच्या आयात किमती कमी केल्यामुळे 1 लाख 60 हजारांच्या पुढे गेलेला सोन्याचा दर आता कमी होण्याची शक्यता आहे.

हा कर सर्व प्रकारच्या सोन्याच्या आयातीवर लागू होणार असून जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या तर भारतातील सोने आणि चांदीच्या किमती कमी होणार आहे. ही शुल्क कपात फक्त उच्च शुद्धतेच्या सोन्याच्या बार आणि नाण्यांवर तसेच चांदीच्या बुलियन आणि पदकांवर लागू करण्यात आली आहे. या सवलतीच्या कक्षेत सोन्याचे दागिने, इतर मौल्यवान धातूंनी बनवलेल्या वस्तू तसेच पोस्ट, कुरिअर किंवा मालवाहतूक माध्यमातून करण्यात येणाऱ्या सोन्याच्या आयातीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या दागिन्यांच्या आणि वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच कर भरावा लागणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री