आठवड्यात सोने चांदीच्या दरात विशेष बदल झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सोन्यांच्या दरात सातत्याने होणारी वाढ बघून ग्राहकांकडून सोनं खरेदी करावं की, नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सोन्याने आतापर्यंत आपल्या दरात ऐतिहासिक उच्चांक गाठला असून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घडामोड घडली आहे. अशातच आज देशात 10 ग्रॅमनुसार 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 129,617 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 141,400 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 262,640 रुपये आहे. त्याचसोबत 10 ग्रॅम चांदीचा दर 2,626 रुपये आहे.
हेही वाचा- Share Market Crash: शेअर बाजारात हाहाकार ! 6 दिवसांत गुंतवणूकदारांचे 17 लाख कोटी पाण्यात; 'ही' 5 कारणे ठरली घसरणीला जबाबदार
तर शहरानुसार बघायच झालं तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 129,388 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 141,150 प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 129,388 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 141,150 रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 129,388 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 141,150 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 129,388 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 141,150 रुपये आहे.
Weather Update : राज्यात होणार ट्रिपल अटॅक? हवामान खात्याचा थेट इशारा; थंडी, पाऊस अन् मोठं संकट ...
तज्ज्ञांनुसार, सोने चांदीच्या दरात सातत्याने बदल होण्यामागे दोन कारण समोर आल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची शक्यता वर्तवली जात असल्याने डॉलरमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीमुळे जागतिक व्यापारात चिंतेचे वातावरण आहे. या कारणांनी सोनं-चांदीच्या दरात ऐतिहासिक उसळण आली आहे. त्यामुळे सराफा बाजारातील तेजी कायम राहणार असून अमेरिकन डॉलरची हालचाल आणि महागाईचा डेटा सोने-चांदीच्या किमतींवर परिणाम करेल.