राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफी योजनेची चौथी यादी जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यात एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफी योजनेची चौथी यादी जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना लाभ
maharashtra farmers

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती आणि २ लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतक-यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी गुरुवारी सहकार विभागाकडून प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने केलेल्या संगणकीय प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा कायम! कुठे पावसाच्या सरी, तर कुठे उन्हाचा चटका; जाणून घ्या हवामानाचा रिपोर्ट

पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७ आणि तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२, अशा एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.तर आज, एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number