Gold Silver Rate Today: सोन्याची चमक फिकी! सलगच्या दरवाढीनंतर बाजारात मोठी घसरण; पाहा मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील नवे दर

जागतिक बाजारातील हालचाली आणि डॉलर-रुपया विनिमय दरातील बदलांचा या दरांवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Gold Silver Rate Today: सोन्याची चमक फिकी! सलगच्या दरवाढीनंतर बाजारात मोठी घसरण; पाहा मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील नवे दर

मुंबई: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या कलानुसार देशांतर्गत सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांनी आज पुन्हा एकदा कूस बदलली आहे. काल मंगळवारी सोन्याच्या भावात झालेली मोठी दरवाढ पाहून सामान्य ग्राहकांच्या पोटात गोळा आला असतानाच, बुधवारी 18 मार्च 2026 रोजी, मार्केट उघडताच किमतीत घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरातील ही 'नरामाई' लग्नसराईच्या काळात खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारी ठरली आहे. विशेषतः 24 कॅरेट आणि 22 कॅरेट अशा दोन्ही श्रेणींमध्ये प्रति तोळा 300 ते 330 रुपयांची कपात नोंदवण्यात आल्याने बाजारात व्यवहारांची गती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकडेवारीचा सखोल विचार केला असता, शुद्धतेचा मापदंड असलेल्या 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा (10 ग्रॅमसाठी) 1,57,750 रुपयांवर स्थिरावले आहेत. मंगळवारच्या तुलनेत यामध्ये 330 रुपयांची घट झाली आहे. तर दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 300 रुपयांची कपात होऊन ते 1,44,600 रुपयांवर आले आहे.

18 कॅरेट सोन्याचे दरही प्रति ग्रॅम 25 रुपयांनी घसरून 11,831 रुपयांवर पोहोचले आहेत. किमतीतील ही अल्पशी घसरण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'कॉमॅक्स' बेंचमार्क आणि रुपया-डॉलरच्या विनिमय दरातील चढ-उताराचा थेट परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: IPL 2026: KKR ला दुहेरी झटका तर RCB ची धाकधूक वाढली; आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बड्या खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण

राज्यानुसार सोन्याच्या दरात असलेली तफावत आजही कायम असून, दक्षिण भारतात सोन्याची चमक अधिक महागडी असल्याचे दिसून येते. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 15,895 रुपये प्रति ग्रॅम इतका उच्चांकी आहे, तर मुंबई, पुणे, हैदराबाद आणि केरळमध्ये हाच दर (एक ग्रॅमसाठी) 15,775 रुपयांवर आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्यासाठी ग्राहकांना (एक ग्रॅमसाठी) 15,824 रुपये (24 कॅरेट) मोजावे लागत आहेत. शहरांमधील या फरकामुळे स्थानिक स्तरावर मागणी आणि पुरवठ्याचे गणितही बदलताना दिसत आहे. मात्र, एकूणच बाजाराचा मूड पाहता सोन्याचे दर अद्यापही उच्चांकी पातळीच्या आसपासच घुटमळत आहेत.

सोन्यासोबतच चांदीनेही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः महागाई विरोधातील एक सक्षम पर्यायी धातू म्हणून चांदीची मागणी वाढली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला चांदीच्या दराने प्रति किलो 2,95,000 ते 3,15,000 रुपयांची ऐतिहासिक पातळी गाठली होती. मात्र, महिन्याच्या मध्यापर्यंत ही लाट काहीशी ओसरली असून सध्या चांदी 2,70,000 ते 2,75,000 रुपये प्रति किलोच्या दरम्यान व्यवहार करत आहे. चांदीच्या दरातील ही अस्थिरता जागतिक औद्योगिक मागणी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होणाऱ्या बदलांशी सुसंगत असल्याचे जाणकार सांगतात.

भारतीय संस्कृतीत सोन्याकडे केवळ एक अलंकार म्हणून नव्हे, तर 'संकट काळातील सोबती' म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच दर कितीही वाढले तरी भारतीय ग्राहकांचे सोन्याशी असलेले नाते अतूट आहे. सध्याची ही दरकपात तात्पुरती असली तरी, बाजारातील तज्ज्ञांच्या मते आगामी काळात जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांचे धोरण यावरच सोन्याची पुढची दिशा अवलंबून असेल. 

सराफा बाजारातील ही हालचाल पाहता, येत्या काही दिवसांत सोने-चांदीच्या किमती पुन्हा उसळी घेतात की स्थिर राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सामान्य ग्राहकांनी खरेदीपूर्वी शहरातील स्थानिक कर आणि नवे दर तपासूनच व्यवहार करणे हिताचे ठरेल.

हेही वाचा: Stock Market Today: गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार उसळी; पाहा आजचे टॉप गेनर्स

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number