सणासुदीत रेल्वे तिकिटाचं आरक्षण नाही? नो टेन्शन! पुणे विभागातून 216 स्पेशल ट्रेन ; कधी अन् कोणत्या मार्गावर धावणार?

Festival Special Trains : सणाच्या निमित्ताने पुणेकरांसह असंख्य प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सणासुदीच्या दिवसात होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विशेष गाड्या या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune Division Announces 216 Extra Train Trips
पुणे विभागातून रेल्वेच्या 216 अतिरिक्त फेऱ्या

पुणे : नवरात्र, दिवाळी आणि छट पूजा सणाच्या निमित्ताने पुणेकरांसह असंख्य प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सणासुदीच्या दिवसात होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 7 विशेष गाड्या या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या तब्बल 216 फेऱ्या सोडल्या जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या रेल्वे नेमक्या कोणत्या शहरांसाठी आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.

कोणत्या शहरांसाठी धावणार विशेष गाड्या?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणेसह हडपसर आणि कोल्हापूर या स्थानकांवरुन उत्तर भारतासह विदर्भ आणि कर्नाटकामधील महत्त्वाच्या शहरांसाठी या अतिरिक्त गाड्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची आता वेटिंगच्या टेन्शपासून सुटका होणार आहे. मात्र, कोणत्या मार्गावर नेमक्या किती फेऱ्या होणार आहे, तेही पाहूयात.

हेही वाचा-विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ; ऑनलाइन अर्जही शुल्काविना भरता येणार

‘या’ मार्गांवर सर्वाधिक फेऱ्या
सणांच्या दिवसांत धावणाऱ्या या फेऱ्यांमध्ये सर्वाधिक फेऱ्या या हडपसर-गोरखपूर-हडपसर यासाठी तब्बल 64 आणि कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूरसाठी 64 फेऱ्या या मार्गांवर होतील.

हडपसर-गोरखपूर ही विशेष गाडी ही 16 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या दरम्यान दर सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी सुटेल. तर परतीची गाडी ही 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान गोरखपूरहून संध्याकाळी साधारण 5 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.

खरं तर दोन्ही बाजूने 32-32 अशा एकूण 64 फेऱ्या होतील. हडपसर-गाझीपूर सिटी तसेच नागपूर-हडपसर या मार्गावर आठवड्यातून दोनदा एक्सप्रेस धावतील. नागपूर-हडपसर द्वी-साप्ताहिक सुपरफास्टच्या 26 आणि साप्ताहिक सुपरफास्टच्या 14 अशा 40 फेऱ्या या प्रवाशांसाठी असणार आहेत.

हेही वाचा-महत्त्वाची बातमी! जमीन-घराच्या दस्त नोंदणीसाठी आता आधार कार्ड बंधनकारक; आजपासून नवा नियम

राज्यातील ‘या’ मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या
दुसरीकडे पुणे-न्यू अमरावती-पुणे विशेष गाडीच्या 12 फेऱ्या या 13 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवार आणि बुधवारी होणार आहेत. कोल्हापूर-कलबुर्गी ही विशेष गाडी 10 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान शुक्रवार सोडून दररोज धावणार आहे. तर मुंबई तील सीएसएमटी ते कोल्हापूर सात्पाहित विशेष गाडीच्या 12 फेऱ्या होणार असून त्या 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होतील. शिवाय खडकीहून हजरत निजामुद्दीन 28 फेऱ्या आणि सांगानेर 12 फेऱ्या होतील. महत्त्वाचे म्हणजे या सर्व गाड्यांचे आरक्षण हे 2 ऑक्टोबरपासून अर्थात उद्यापासू सुरु होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version