विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ; ऑनलाइन अर्जही शुल्काविना भरता येणार

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये सरकारने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला.

विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ; ऑनलाइन अर्जही शुल्काविना भरता येणार
265 Taluka Drought Declared

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये सरकारने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मदतकार्य सुरू केले आहे. यात आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची भर पडली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis: ‘लग्नातील उधळपट्टी टाळा अन् दुष्काळग्रस्तांना मदत करा…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जनतेला संवेदनशील आवाहन

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number