Wednesday, January 14, 2026 12:48:18 PM

Apple Watch Hypertension Alert : ग्राहकांसाठी दिलासा! आता ॲपल वॉचमध्ये मिळणार High BP अलर्ट फीचर

कंपनीने आता भारतीय ग्राहकांसाठी ‘हाय ब्लड प्रेशर अलर्ट’ फीचर उपलब्ध केले असून, दीर्घकालीन उच्च रक्तदाबाची संभाव्य लक्षणे आढळल्यास घड्याळ वापरकर्त्यांना वेळेवर सूचना देणार आहे.

apple watch hypertension alert  ग्राहकांसाठी दिलासा आता ॲपल वॉचमध्ये मिळणार high bp अलर्ट फीचर

Apple Watch Hypertension Alert : भारतातील Apple Watch वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचे हेल्थ फीचर सुरू करण्यात आले आहे. कंपनीने आता भारतीय ग्राहकांसाठी ‘हाय ब्लड प्रेशर अलर्ट’ फीचर उपलब्ध केले असून, दीर्घकालीन उच्च रक्तदाबाची संभाव्य लक्षणे आढळल्यास घड्याळ वापरकर्त्यांना वेळेवर सूचना देणार आहे.

कसे काम करते हे फीचर?

हे फीचर Apple Watch च्या ऑप्टिकल हार्ट सेन्सरमधून मिळणाऱ्या 30 दिवसांच्या PPG (Photoplethysmography) डेटाचे मशीन लर्निंगच्या मदतीने विश्लेषण करते. जर दीर्घकाळ उच्च रक्तदाबाची चिन्हे जाणवली, तर घड्याळ वापरकर्त्यास अलर्ट पाठवते. हे फीचर Apple Watch Series 9 किंवा त्याहून नवीन मॉडेल तसेच Apple Watch Ultra 2 व त्यानंतरच्या मॉडेलवर उपलब्ध आहे.

हेही वाचा - Save Electricity: छोटासा पण शक्तिशाली 'स्मार्ट प्लग'! जाणून घ्या, या डिव्हाईसने वीज कशी वाचेल..

कोण वापरू शकतात हे फीचर?

हे फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांनी हेल्थ ॲपमध्ये सेटअप करणे आवश्यक आहे. सेटअपदरम्यान वयासह काही माहिती विचारली जाईल. फक्त 22 वर्षे व त्यापुढील वयाच्या व्यक्तींनाच हे फीचर उपलब्ध आहे. आधीच उच्च रक्तदाबाची समस्या असलेले आणि औषधोपचार सुरू असलेल्यांसाठी हे फीचर उपलब्ध नाही.जगभरात सुमारे 1.4 अब्ज लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत, परंतु त्यापैकी 40 टक्के लोकांना स्वतःबद्दल माहिती नसते. सुरुवातीच्या टप्प्यात उच्च रक्तदाबाची लक्षणे स्पष्ट दिसत नसल्याने ही समस्या गंभीर ठरते. Apple Watch चे हे नवे फीचर जागरूकता वाढवण्यास मदत करणार असल्याचा Apple चा दावा आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसशी बोलताना Apple मधील हृदयरोगतज्ज्ञ ॲडम फिलिप्स यांनी सांगितले की, अनेक लोक वर्षानुवर्षे उच्च रक्तदाबासोबत जगतात, परंतु त्यांना त्याची जाणीवही नसते. त्यामुळे वेळेवर सूचना देणारी तंत्रज्ञानाधारित साधने उपयुक्त ठरतात. हे फीचर विकसित करताना कंपनीने 1 लाखांहून अधिक लोकांचा डेटा वापरला. त्यानंतर 2 हजार पेक्षा अधिक लोकांवर क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या. पहिल्याच वर्षात 10 लाखांहून अधिक लोकांना याचा फायदा होईल, असा फिलिप्स यांना विश्वास आहे.

हेही वाचा - Human Washing Machine: बाजारात आले माणसांना आंघोळ घालणारे अनोखे वॉशिंग मशीन; 15 मिनिटांत पूर्ण शरीर स्वच्छ

भारतातील वापरकर्त्यांसाठी फायदेशीर

भारतामध्ये प्रत्येक तीनपैकी एक नागरिक उच्च रक्तदाबाच्या धोक्यात असल्याचे अहवालात नमूद आहे. प्रारंभिक टप्प्यात लक्षणे न दिसल्याने उच्च रक्तदाबाचे निदान अनेकदा उशिरा होते. अशा परिस्थितीत हे फीचर महत्त्वाचे ठरू शकते. तथापी, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, हे फीचर हृदयगती सेन्सरच्या दीर्घकालीन डेटावर आधारित आहे. 
 


सम्बन्धित सामग्री