दिवाळीचा आनंद द्विगुणित! परिवहन कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस; रक्कम ऐकून व्हाल खुश

Navi Mumbai News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली.
नवी मुंबई
Navi Mumbai

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे. एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांना यंदा चांगलाच घसघशीत दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे.

खात्यात जमा होणार किती रुपये?
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन सेवेमधील असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता सरसकट 45 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. काही दिवसांआधी महापालिकेच्या नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 45 हजारांचा बोनस जाहीर केला होता. त्याच धर्तीवर आता परिवहन कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हाच निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे परिवहन विभागातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा – प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीसाठी 1200 जादा बसेसचे नियोजन; नेमकं कुठून कधी धावणार? वाचा

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना मिळालेल्या या बोनसमुळे त्यांचा सण आणखी खास होणार आहे. परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, ते म्हणाले की, परिवहनचा तोटा कमी करुन उत्पन्न वाढवणे हे आमचे मुख्य उद्धिष्ट आहे. याच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच हे उद्दिष्ट नक्की पार करु. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणूनच हा बोनस देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version