मुंबई ते लातूक प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आतापर्यंत या प्रवासासाठी प्रवाशांना साधारण 10 ते 11 तास लागत होते. अर्थात संपूर्ण दिवस प्रवासातच जायचा. मात्र, आता हाच प्रवास अवघ्या 5 तासांत पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या नव्या द्रुतगती मार्गामुळे हे शक्य होणार आहे.
या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत सरकारने मोठी अपडेट दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने या द्रुतगती मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल हा तयार केला असून या प्रकल्पाच्या अंतिम संरेखनाला देखील मुंजरी देण्यात आलेली आहे.
हेही वाचा-हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; आता थेट ‘इतका’ वाढून मिळणार पगार
जाणून घ्या नवीन मार्ग
आता मार्गवन विभागाच्या अंतिम मंजुरीनंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेला ही वेग येणार आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु केल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा द्रुतगती मार्ग सहा पदरी असून प्रवेश नियंत्रित असणार आहे.
मुंबईसह या शहरापर्यंत पोहोचणार नवा मार्ग
हा मार्ग फक्त मुंबई आणि लातूरला जोडणार नाही, तर कल्याणसारख्या मोठ्या शहरांना ग्रामीण महाराष्ट्राशी जोडणार महत्त्वाचा दुवा ठरणा आहे. तसेच हा नवा महामार्ग राज्यातील अन्य प्रमुख द्रुतगती मार्गांना देखील जोडला जाणार आहे, त्यामुळे राज्यभरातील प्रवास हा अधिक सोयीचा होणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर