गुड न्यूज! 2 तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत; हिंजवडी मेट्रोबाबत मोठी अपडेट; वाचा कधी सुरु होणार?

Hinjewadi Metro Update : पुण्यातील हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीमुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच हिंजवडी मेट्रो गेल्या तीन महिन्यांपासून रिकामी धावत असल्याची चर्चा आहे. आता मेट्रोच्या उद्घाटनाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, प्रवाशांची प्रतीक्षा संपणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हिंजवडी मेट्रो
Hinjewadi Metro

गेल्या काही वर्षांत मुंबईसह पुण्यातही मेट्रोचं जाळं हे वेगाने विस्तारलं आहे. आता पुण्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग असलेल्या हिंजवडी मेट्रोच्या प्रवासी सेवेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मेट्रो नेमकी कधीपासून सुरु होणार, याचीच नागरिक आतुरतेने वाट पाहत आहे. अशामध्येच मेट्रोच्या उद्घाटनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

कधीपासून सुरु होणार सेवा?
पुण्याच्या हिंजवडी ते शिवानीगर असा 23 किलोमीटर मेट्रो मार्ग आहे. या मार्गाचे काम संपूनही प्रवाशांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही मेट्रो प्रवाशांविना फक्त रिकाम्या फेऱ्या मारताना दिसत आहे.

हेही वाचा – मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! कल्याण-कसारा मार्गाबाबत मध्य रेल्वेने दिली मोठी अपडेट

खरं तर 3 नोव्हेंबर रोजीच्या नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान या हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र आता पुन्हा एकदा उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलेला आहे. मूळ नियोजनानुसार ही मेट्रो गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुरु होणार होती. पण संथ कामाच्या गतीमुळे ही डेडलाईन 2026 मार्च पर्यंत गेली. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उद्घाटन रखडले गेले. आता पुन्हा पंतप्रधानांच्या दौऱ्या विलंब होत आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version