गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आलेली आहे. खावडा परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताता तब्बल 7 निष्पाप कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात नेमका कसा घडला, बचावकार्यादरम्यान काय घडलं आणि पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात, याकडे लक्ष लागलं आहे.
कामगारांचा प्रवास ठरला अखेरचा
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे साधारण तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. विरुद्ध दिशेने येणारा भरधाव ट्रक आणि कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली, असल्याची माहिती समोर आली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा अक्षरश: चुराडा झाला.
या अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक धावले, पण समोरील सर्व दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. सात कामगार ढिगाऱ्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली होती. मात्र, तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
भीषण अपघातामागे निष्काळजीपणा?
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून या अपघातामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात नेमकी चूक कोणाची? ट्रक चालक झोपेत होता का? की ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला? पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.