दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले आहे. यात आंदोलनासाठी प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी भारतात आला होता.
दरम्यान, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सीजेपीनं सोशल मीडियावर दावा केला आहे की, ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुग्राम येथील घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सीजेपीने म्हटले आहे. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अजूनही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. दिल्ली पोलिसांकडूनही याबाबत कोणतेबही स्पष्टीकरण आलेले नाही.