पुणेकरांनो, लक्ष द्या! 11 ते 20 ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; PMPML बससेवेबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

Pune Traffic Update : पुण्यात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.

पुणेकरांनो, लक्ष द्या! 11 ते 20 ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; PMPML बससेवेबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
Navratri Traffic Update in Pune

पुणे शहरातील वाहनचालकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तर काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद असून, बऱ्याच ठिकाणी नो-पार्किंग घोषित केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी कोणते रस्ते बंद आहेत आणि पर्यायी मार्ग कोणते, हे जाणून घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुण्यात कोणते रस्ते बंद?
मिळालेल्या माहितीनुसार, भवानी माता मंदिर परिसरातील महात्मा फुले रस्तावर रामोशी गेट चौक ते जुना मोटर स्टँड या दरम्यान सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असणार आहे. पण अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही वाहनांना या मार्गावर जाण्यास परवानगी नसणार असून या संपूर्ण पट्ट्यात पार्किंगही बंद असेल. वाहनचालकांनी या मार्गावरील ए.डी.कॅम्प चौक, भारत सिनेमा आणि पदमजी चौकाचा वापर करावा, अशी माहिती समोर आलेली आहे.

हेही वाचा-ऐन दिवाळीत विमान प्रवाशांना मोठा धक्का! इंडिगोची उड्डाणे रद्द; पूर्ण वेळापत्रक आले समोर

बसचे बदललेले मार्ग जाणून घ्या
पीएमपी बसच्या मार्गातही बदल करण्यात आलेला आहे. रामोशी गेटमार्गे जाणाऱ्या सर्व बसेस आता ढोलो चौक, सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान चौक तसेच खाणेमारुती चौकातून वळण्यात आलेल्या आहेत. तर तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरातही गणपती चौक ते मंदिर आणि सकाळ प्रेसकडून मंदिराकडे जाणार रस्ता हा बंद राहणार आहे.

वाहनचालकांनी सेवासदन चौक, बाजीराव रस्ता तसेच शनिवारवाडा या मार्गाचा वापर करावा. तांडबी जोगेश्वरी, अष्टभुजा देवी,दुर्गादेवी मंदिर परिसरातही पूर्णपणे पार्किंग बंदी असेल.

हेही वाचा-मतदारांनो, शेवटची संधी! SIR ची अंतिम मुदत जवळ; जाणून घ्या शेवटची तारीख काय?

‘या’ भागात विशेष पार्किंगची व्यवस्था
या दिवसात येणाऱ्या भाविकांसाठी टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता आणि मंडईतील पार्किंग उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. चतुःशृंगी मंदिर परिसरात गर्दीनुसार सेनापती बापट या रस्त्यावर एकेरी वाहतूक ही सुरु राहिल. .पुणे वाहतूक विभागाने शारदीय नवरात्रोत्सव 11 ते 20 ऑक्टोबर दरम्यान साजरा होत असून गर्दीमुळे हे बदल केल्याचे सांगितले. उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number